fbpx

विश्वात्मक संवाद पर्व निर्णायक – डॉ.श्रीपाल सबनीस 

पुणेः- चीनच्या विस्तारवादाने तैवान सह तिबेटच्या अस्तित्वाला घायाळ केले त्यामुळे चीनी हिटरशाहीचा धोका समुळ विश्र्वशांतीला निर्माण झाला आहे. दलाई लामा यांना भारताने आश्रय देऊन बौद्धांच्या करुणेचा सन्मान केला आहे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 

स्वाभिमानी आणि अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणारी लढाउ संघटना म्हणून परिचित असणाऱ्या दलित पॅंथर या संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे दलित पॅंथर आॅफ इंडियाचे राष्ट्रीय नेते बापू भोसले यांना विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पॅंथररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर रमाई महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, माजी महापाैर अंकुश काकडे, शाहीर संभाजी भगत, रविंद्र माळवदकर, डाॅ. अमोल देवळेकर, लता राजगुरु आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. 

डाॅ. श्रीपाल सबनीस म्हणाले, या कृतीतून भारत विश्वशांतीचा कैवारी असल्याचे सत्य पुऩःपुम्हा सिद्ध झाले आहे. बापू भोसले पॅंथरचा वारसा आसूनही त विश्वशांतीच्या ध्यासात रमलेत.तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे कार्य चालू आहे. म्हणुनच त्यांना दलाई लामांनी बापूंना पुरस्कार प्रदान केला आहे. पॅंथरची नाळ डॉ. आंबेडकरांशी जुळुन असली तरी दलीत मुक्तीचे मुळ अधिष्ठान बाैध्द धम्मांचे आहे. म्हणुऩ संघर्षा सोबतच संवादाचे विश्र्वात्मक मूल्य पेरण्याची आज गरज आहे. संघर्षापूर्वी व नंतरही संवादाचे मुल्य श्रेष्ठच आहे. 

पुरस्कार्थी बापू भोसले यांनी यावेळी पुरस्काराला उत्तर दिले. तसेच पॅंथर संघटनेची वाटचालीवर माजी महापाैर अंकुश काकडे, संभाजी भगत, रविंद्र माळवदकर, डॉ. अमोल देवळेकर, लता राजगुरु आदी मान्यवरांनी प्रकाशझोत टाकला. 

आडकर फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर रमाई महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. 

छायाचित्र ओळीः- दलित पॅंथर संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बापू भोसले यांना डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पॅंथररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी डाविकडून  अॅड. प्रमोद आडकर,  बापू भोसले,डॉ. श्रीपाल सबनीस आणि वसंतराव गाडगीळ. 

Leave a Reply

%d bloggers like this: