fbpx

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया; प्रवेशासाठी उरले फक्त चार दिवस

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची नियमित प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू झाली असून या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत जवळपास ९५ ते १०० अभ्यासक्रमांना विद्यार्थी अर्ज करू शकतात. प्रवेश घेण्यासाठी आता केवळ चार दिवस उरले असून प्रवेशाची अंतिम मुदत १२ जुलै आहे. तर विलंब शुल्कासहित विद्यार्थ्यांना १७ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांत चालणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, अंतरविद्याशखिय (इंटिग्रेटेड), बहुविद्याशाखिय (इंटरडिसिप्लीनरी) अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना याची संपूर्ण माहिती http://www.unipune.ac.in या संकेस्थळावर एडमिशन सेक्शनमध्ये मिळेल. किंवा https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या लिंकवर लॉग इन करावे.

विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या माध्यामातून हे प्रवेश दिले जातील. ही प्रवेश परीक्षा २१ ते २४ जुलैदरम्यान होणार आहे.

ही सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश परीक्षा शुल्कही ऑनलाईन भरायचे आहे. तर प्रवेश परीक्षा देखील ऑनलाईन होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज नाही.

दरम्यान ओपन अँड डिस्टंट लर्निग ची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून याचेही प्रवेश लवकरच सुरू होतील.

Leave a Reply

%d bloggers like this: