Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानपरिषदेवर नवनिर्वाचित झालेल्या 10 सदस्यांना शपथ

मुंबई  :- महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.

 राष्ट्रवादी कॉँग्रेस रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, भाजप चे प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय, तर कॉँग्रेसचे अशोक ऊर्फ भाई जगताप व शिवसेनेचे आमश्या पाडवी,सचिन अहिर  यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

यावेळी विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading