fbpx
Thursday, September 28, 2023
BusinessLatest News

यूपीआयद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे भरणे झाले सोपे

मुंबई : पेटीएम या भारतातील आघाडीच्या डिजिटल व आर्थिक सेवा कंपनीने २०१४ मध्ये भारतीयांसाठी देशातील पहिले डिजिटल वॉलेट सादर केले होते. ही सेवा आता लाखो युजर्सच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये पैशांची भर करण्यासाठी युजर्स यूपीआय, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अशा विविध पर्यायांमधून निवड करू शकतात. यूपीआय ही त्वरित पैशांची भर करण्यासाठी सर्वात सुरक्षित पद्धत आहे आणि ही प्रक्रिया काही सेकंदांमध्येच पूर्ण होते.

युजर्स पेटीएम अॅपसोबत त्यांचे बॅक खाते लिंक करत जलद व सुलभ व्यवहारांसाठी पेटीएमवरील यूपीआय वैशिष्ट्याचा वापर करू शकतात. बँक खाते लिंक झाल्यानंतर युजर त्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये त्वरित सुरक्षितपणे पैशांची भर करण्यासाठी यूपीआयचा वापर करू शकते.

यूपीआद्वारे पेटीएम वॉलेटमध्ये असे भरा पैसे:

पेटीएम अॅप उघडा आणि ‘पेटीएम वॉलेट’ पर्याय निवडा. ‘अॅड मनी टू मनी वॉलेट’ अंतर्गत बॉक्समध्ये तुम्हाला पाहिजे असलेली रक्कम प्रविष्ट करा. यानंतर प्रोसेस बटनावर क्लिक करा. युजरला यूपीआयसह वॉलेटमध्ये पैशांची भर करण्यासाठी विविध पर्याय दिसतील. यूपीआय पर्यायासह पुढे जा आणि तुमच्या वॉलेटमध्ये त्वरित पैशांची भर करण्यासाठी यूपीआय पिन प्रविष्ट करा. व्यवहार पूर्ण झाल्यावर अपडेटेड बॅलन्स तपासा.

पेटीएम वॉलेट बॅलन्सचे उपयोग:

व्यक्ती युटिलिटी बिल भरण्यासाठी, मोबाइल (प्रीपेड किंवा पोस्‍टपेड), डीटीएच, मेट्रो कार्ड रिचार्ज करण्यासाठी आणि अशा अनेक कृतींसाठी त्यांच्या पेटीएम वॉलेट बॅलन्सचा वापर करू शकतात. हा बॅलन्स रिटेल शॉप्स, पेट्रोल पंप्स आणि विविध इतर ऑफलाइन व ऑनलाइन आऊटलेट्समध्ये पेमेंट्ससाठी वापरता येऊ शकतो.

युजर्स पेटीएम वॉलेट बॅलन्सचा वापर करत पेटीएमवर विमान, रेल्वे व बस तिकिटे बुक करू शकतात, मूव्ही तिकिटे, सबस्क्रिप्शन्स व औषधे खरेदी करू शकतात. आयआरसीटीसी आणि इतर ट्रॅव्हल तिकिट बुकिंग अॅप्स व वेबसाइट्सवर पेमेंट्स करण्यासाठी देखील पेटीएम वॉलेटचा वापर करता येऊ शकतो. पेटीएम वॉलेट बॅलन्स फास्टॅग आणि ट्रान्झिट कार्ड बॅलन्स देखील दुप्पट करते.

Leave a Reply

%d bloggers like this: