संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागच्या वतीने निदर्शने
पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे संजय गांधी निराधार योजनेच्या जाचक अटी रद्द करण्यासाठी अंध, अपंग, विधवा, निराधार, वयोवृध्द असलेल्या नागरिकांसह भरपावसात निदर्शने करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजित यादव म्हणाले की, पुणे शहर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेअंतर्गत शेकडो लाभार्थी लाभ घेत आहे, परंतु अलीकडच्या काही महिन्यात लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी कधीही सक्ती न केलेला दरवर्षी २१ हजार रूपये उत्पन्न दाखल्याची जाचक अट रद्द करावी, लाभार्थ्यांना दरमहा वेळेत पेन्शन मिळावी त्याचप्रमाणे मागील ३–४ महिने या पेन्शनपासून लाभार्थी वचिंत राहिले आहेत. अनेक बँका लाभार्थ्यांना पूर्ण पेन्शन काढून देत नाहीत. काही बँकांनी उत्पन्नाच्या दाखल्याची भीती दाखवून पेन्शन बंद केली आहे. लाभार्थी होण्यापूर्वी एखाद्याचा मृत्यू परराज्यात झाला असल्यास त्या कार्यालयाची NOC ची अट रद्द करावी, १५ वर्ष रहिवास दाखल्याची अट रद्द करावी. अशा स्वरूपाच्या अनेक अडचणींचा लाभार्थांना सामना करावा लागतो. तरी या सर्व गोष्टींचा विचार करून सदर योजना सूटसूटीत करावी.’’
यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अजित दरेकर, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, मेहबुब नदाफ, लता राजगुरू, रजनी त्रिभुवन, राहुल तायडे, मारूती माने, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, देवदास लोणकर, विल्सन चंदेलवेल, सचिन सुडगे, संदिप कांबळे, संतोष हंगरगी, दिपक मोरे, सचिन भोसले, आदींसह अंध, अपंग, विधवा, निराधार, वयोवृध्द मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
