fbpx

खाड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू, यंदाच्या पावसाळ्यातील पहिला बळी

ठाणे : पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यातील खड्डे हे वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळेच असतात. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ठाण्यात खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दीवसापासून ठाण्यात जोरदार पाऊस सुरू असून यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यामुळे गेलेला हा पहिला बळी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनीश खान (वय – 37) रा. मुब्रा असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. आज सकाळी कामानिमित्त ते घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी बाईकवरुन जात असताना त्यांचा एका मोठ्या खड्ड्यामध्ये तोल जावून ते रस्त्यावर खाली पडले. त्यानंतर येणाऱ्या महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली येवून त्यांचा अपघात झाला. तेथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसांनी त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केले असता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

विशेष म्हणजे तीन तासानंतर याच खड्यात आणखी एक दुचाकीस्वार तोल जावून पडला. पण सुदैवाने त्याला फारशी इजा झाली नाही.

 

Leave a Reply

%d bloggers like this: