Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देवेंद्रजी वेष बदलून शिंदेंना दीड वर्षांपासून भेटायचे, अमृता फडणवीसांचा खळबळजनक खुलासा

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाला पाठींबा देत भाजपने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानव लागलं. मात्र देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही उलट कोणतंही पद स्वीकारणार नाहीत याची माहिती आपल्याला आधीच होती असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस बोलत होत.  देवेंद्र फडणवीस आणि आमची भेट रात्री उशिरा व्हायची अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली होती.अमृता फडणवीस यांनी देखील शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. देवेंद्रजी रात्री वेष बदलून शिंदेंना भेटायला जायचे. या भेटी मागील दीड वर्षांपासून सुरू होत्या, हुडी आणि गॉगल घातलेले देवेंद्रजी मलाही ओळखू येत नसल्याचे देखील अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

विरोधी पक्षनेते असताना देखील देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढा दिला. देवेंद्रजींनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading