Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

‘जिवो जिवस्य जीवनम् ‘ माहितीपटाची इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

पुणे : पुण्यातील युवा दिग्दर्शक सिध्दार्थ बाळकृष्ण दामले यांच्या ‘जिवो जिवस्य जीवनम् ‘ या माहितीपटाची अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल भोपाळ येथे २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडी कडून घरट्याची निर्मिती, त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंडयातून होणारे प्रजनन , पुढे जाणारे जीवन आणि यातून निसर्गाचा दिला जाणारा संदेश, हा या माहितीपटाचा विषय आहे.

डॉ. बाळकृष्ण दामले यांची निर्मिती असून मोहिनी दामले, मिलिंद पाटील यांनी माहितीपटासाठी संशोधन केले. राजश्री गोखले यांनी निवेदन केले असून तांत्रिक बाजू वासिम पठाण यांनी सांभाळली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading