Saturday, September 5, 2026
BusinessLatest News

प्रथमच! ‘क्यूआर कोड’ स्कॅन करा आणि तुमच्या आयुर्विमा पॉलिसीची सेवा मिळवा!

पुणे  : आयुर्विमा पॉलिसीबाबतच्या आपल्या गरजा ग्राहकांना सेल्फ-सर्व्हिस पद्धतीने तात्काळ पूर्ण करता येण्यासाठी, भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’ने ‘क्यू-आर कोड’शी संलग्न सेवा सुरू केली आहे. या उद्योगात प्रथमच सादर झालेला हा उपक्रम असून ग्राहकांना साध्या व सुरक्षित पद्धतीने आपल्या फोनवरून १५ लोकप्रिय सेवा मिळविता येणार आहेत. ग्राहकाला फक्त कंपनीच्या शाखांमध्ये उपलब्ध असलेला ‘क्यूआर-कोड’ स्कॅन करावा लागेल आणि त्यानंतर त्यांना आयुर्विमा पॉलिसीसंबंधित कामे सेल्फ-सर्व्हिस स्वरुपात करता येतील.

या उपक्रमाबाबत माहिती देताना कंपनीचे ऑपरेशन्स व ग्राहक अनुभव या विभागांचे प्रमुख राजेश कृष्णन म्हणाले, “आमचे ग्राहक विकसीत होत आहेत आणि त्यांना साध्या व सुरक्षित पद्धतीने सेवांचा आनंद देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उद्योग-प्रथम उपक्रमामुळे आता त्यांच्याकडे क्यूआर-कोड संलग्न सेवेच्या माध्यमातून एक संपूर्ण शाखा अगदी तळहातावर आली आहे. या सुविधेमुळे प्रतीक्षा करण्याचा त्यांचा वेळ कमी होणार आहेच, त्याशिवाय, त्यांच्या कामे सेल्फ-सर्व्हिस पद्धतीने करण्याचा त्यांना एक सोपा आणि आनंददायी अनुभवदेखील मिळणार आहे. ग्राहकांना आमच्यासोबतच अधिक चांगला अनुभव मिळेल, हे निश्चित करण्यासाठी आमच्या सेवा पर्यायांचा विस्तार करण्यासाठी आम्ही गुंतवणूक करत राहू.”

‘क्यूआर-कोड संलग्न सेवा’ ही एक अद्वितीय डिजिटल सेल्फ-सर्व्हिस आहे. ती ‘बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स’च्या सर्व ५०९ शाखांमध्ये उपलब्ध असून ग्राहकांना अखंड सेवा प्रदान करण्यासाठी ती डिझाइन केलेली आहे. ग्राहक यातून आपल्या विम्याचे हप्ते ऑनलाइन पद्धतीने भरू शकतील, पॉलिसीशी संबंधित दस्तऐवज पाहू शकतील किंवा डाउनलोड करू शकतील (उदा. पॉलिसी बाँड, आयटी प्रमाणपत्रे आणि फंड परफॉर्मन्स स्टेटमेंट), आपल्या आवडीनुसार फंडांमध्ये बदल करू शकतील आणि इतरही अनेक कामे सहजपणे करू शकतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading