Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

उस्ताद तौफिक कुरेशी यांचा ‘पंचमरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान

पुणे – ‘पंचम क्रिएशन्स’तर्फे सुप्रसिद्ध तालवाद्य जाणकार आणि वादक उस्ताद तौफिक कुरेशी यांना या वर्षीचा ‘पंचमरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘पंचम क्रिएशन्स’ आणि ‘म्युझिकल डीवाईन’ संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त ‘पंचम द जिनियस’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात कुरेशी यांना हा पुरस्कार कला छाया अॅकेडमीचे संस्थापक ज्येष्ठ तबलावादक भरत जंगम यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या टीममध्ये सहभागी वादक कलाकार, गायक, गायिका, तंत्रज्ञ आणि निष्ठावान पंचमभक्त यांचा सन्मान पंचम क्रिएशनतर्फे ‘पंचमरत्न पुरस्कार’ देऊन केला जातो. पुणेरी पगडी, ट्रॉफी आणि शाल देऊन करण्यात येणारा हा सन्मान संगीत क्षेत्रात आता प्रतिष्ठेचा मानला जातो. या प्रसंगी सुप्रसिद्ध पार्श्वगायक शैलेन्द्रसिंग, मनीष साबडे, दत्ताभाऊ बहिरट तसेच रुपाली पाटील आदी उपस्थित होते.

या नंतर झालेल्या कार्यक्रमात गायक जितेंद्र भूरूक, रेश्मी मुखर्जी, रुपाली घोगरे, विजय जोशी, सचिन केळकर, विवेक पांडे, प्रशांत साळवी आदी गायकांनी आपापल्या कलाविष्कारातून उपस्थितांना पंचम दर्शन घडविले. तर संगीत संयोजक विवेक परांजपे यांच्या मार्गदर्शनात अजय अत्रे, अभिजित भदे, केदार मोरे, नितीन शिंदे, आनंद घोगरे, मिहीर भडकमकर, अमान सय्यद, विलास रायकर, विशाल थेलकर, बाबा खान आणि सुरज दोशी यांनी साथसंगत केली.
पंचम क्रिएशन्सचे आनंद घोगरे, सुरज दोशी, माधुरी जोशी, संगीत जाणकार सचिन केळकर, गायिका रुपाली घोगरे, धनंजय पुरकर, सत्यजित धांडेकर, निवेदक संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
उस्ताद तौफिक कुरेशी यांना गुरुस्थानी मानणाऱ्या प्रसिद्ध तबलावादक नितीन शिंदे यांनी गुरूंच्या सन्मानार्थ त्यांचे आवडते ‘जेम्बे‘ नावाचे आफ्रिकन तालवाद्य त्यांना अर्पण केले. या नवीन वाद्यावर उस्ताद तौफिक कुरेशी यांनी तालवादन कौशल्याचा दाखविलेला कलाविष्कार रसिकांनी अनुभवला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading