Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

येत्या 5 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार

मुंबई :  मान्सून संपूर्ण देशभर सक्रिय झाला असून महाराष्ट्रातही मान्सून सक्रिय राहण्यास अनुकूल वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार विदर्भात व मराठवाड्यात काही ठिकाणी वीजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, राजगड, पालघर आदी ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  येत्या 5 जुलै पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची देखील हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात घाटमाथा व सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड आदी ठिकाणी वीजांच्या गडगडांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात अनेक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असून 7 जुलैसाठी चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या पाचही दिवसात कोकण – गेवा येथे तसेच मुंबई, ठाणे, राजगड, पालघर आदी ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading