माझ्या पाठीत खंजीर खुपसला; मुंबईकरांच्या काळजात कट्यार घुसवू नका – उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतल्यानंतर पहिली कॅबिनेट मिटींग घेतली. या मिटींगमध्ये आरे कारशेडचे काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या विषयी बोलताना माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘माझ्या लोकांनी मला दगा दिला माझ्या पाठीत खंजीर खुपसला. मात्र, मुंबईकरांच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकारला केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना आरे कारशेड ला स्थगिती दिली होती. त्या ऐवजी कांजूर मार्गाचा पर्याय दिला आहे. तेथे जे जंगल आहे त्यावर वन्यजीव अवलंबून आहे. मधल्या काळात तेथे बिबट्या फिरतानाचे फोटो ही आळे आहेत. काल स्थापन झालेल्या सरकारने सत्तेत आल्यावर पुन्हा आरे कारशेडचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हे मुंबईकरांच्या हिताचे नाही. माझ्या लोकांनी मला दंगा दिला माझ्या पाठीत खंजीर खुपसला मात्र, मुंबईकरांच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवू नका, असे ही आवाहन केले.
