पुणे येथे केम्पीच्या नवीन फॅसेलीटीचे उद्घाटन
पुणे : फिनलंडमधील केम्पी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भारतात, इंगळे इंडस्ट्रियल पार्क, पुणे येथे आपली नवीन फॅसेलीटी सुरू केली आहे, आणि भारतीय वेल्डिंग मार्केटमध्ये आपले पाऊल आणखी मजबूत केले आहे. पश्चिम भारतातील पुणे हे एक मोठे आयटी हब आणि भारतातील सर्वात महत्त्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्र आहे. केम्पी गेल्या ११ वर्षांपासून भारतात आपला व्यवसाय चालवत आहे. केम्पीच्या चेन्नईहून पुण्यात जाण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असुन, हा निर्णय केम्पीला येत्या काही वर्षांत भारतातील व्यवसाय वाढवण्यास सक्षम करेल. केम्पी आपल्या नवीन फॅसेलीटी आणि अॅडव्हान्स डेमो एरियामध्ये ग्राहकांस वेल्डिंग प्रशिक्षण सत्र देण्यास उत्सुक आहे, आणि केम्पीचे सर्व ब्रँड शो रूममध्ये चांगले प्रदर्शिन करत आहेत.
पुण्यातील नवीन स्थान आणि व्यवसायाच्या संधींसाठी केम्पीची टीम उत्सुक आहे. सेल्स, वेअरहाऊस, टेक्निकल सपोर्ट आणि विक्रीनंतरची सेवा यासह भारतातील सर्व कार्योंसाठी हे नवीन फॅसेलीटी केंद्र तयार आहे. अजय त्रीखा, व्यवस्थापकीय संचालक, केम्पी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणतात, हे नवीन फॅसेलीटी केंद्र अंदाजे ३,००० चौरस मीटरमध्ये पसरलेले असुन यात केम्पीच्या सर्व ब्रँडच्या उत्पादनांसह शो रूमचा देखील समावेश आहे. जिथे वेल्डिंग डेमो सारख्या सुविधा देखील आहेत. ही गुंतवणूक भारतातील आमच्या ग्राहकांना सेवा व दीर्घकाळ पाठिंबा देण्यासाठीची आमची बांधिलकी दर्शवते. गेर्बेन व्हॅन, डेन बर्ग मार्केट व्हाईस प्रेसिडेंट म्हणतात, नवीन विक्रीसाठी आम्ही अधिकृत उद्घाटनद्वारे प्रवेश केला आहे,जे आमच्या ग्राहकांसाठी सोयीचे आणि जवळचे ठरेल. हा एक मौल्यवान क्षण असु्न केम्पी इंडियाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे.
भारतीय वेल्डिंग बाजारपेठ जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, आणि केम्पीने आणलेल्या या नवीन संधींबद्दल मी खुप उत्साहित आहे,” केम्पीचे जगभरात ८०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि आम्ही पुण्यात २८ कर्मचाऱ्यांसह सुरुवात केली आहे आणि लवकरच ही संख्या वाढणार आहे. आम्ही पुण्यात रोबोटिक सेंटरसाठीही उत्सुक आहोत आणि लवकरच त्यात आणखी गुंतवणूक करू. गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये आमची उलाढाल १७८ दशलक्ष युरो इतकी होती. आमच्या १०००० पेक्षा जास्त मशिन्स भारतीय रेल्वेद्वारे वापरण्यात येत आहेत.
