Saturday, October 24, 2026
BusinessLatest News

अनुराग कटरियारसोबत एनआरएआय (NRAI) पुणेचा पहिला मास्टरक्लास.

पुणे : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरने त्यांच्या पहिल्या वर्षातील पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात अनुराग कटरियार (संस्थापक आणि एमडी, इंडिगो हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या माहितीपूर्ण मास्टरक्लासने केली. ओन युवर रेस्टॉरंट ब्रँड हा कार्यक्रम नुकताच कोरेगाव पार्क, पेंटहाऊस येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यात पुण्यातील प्रमुख रेस्टॉरंटर्स आणि एफ अॅण्ड बी ब्रँड मालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अनुराग कटरियारच्या मास्टरक्लास मध्ये विशेषत: कोविड नंतरच्या अनिश्चित काळात रेस्टॉरंट ब्रँडची स्थापना, देखभाल आणि विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्यांनी व्हायरसचा प्रभाव आणि उद्योगांची लवचिकता यावर देखील भाष्य केले. मास्टरक्लास सत्रानंतर उपस्थीतांच्या प्रश्नांचे आणि उत्तरांचे एक उत्साहपूर्ण सत्र पार पडले. यावेळी मिस्टर कटरियारच्या अनुभवांद्वारे उपस्थीतांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळाले. पुणे चॅप्टर त्यांच्या सदस्यत्वाचा विस्तार करून , अतिथींना शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी देऊन शहरात अद्वितीय समुदाय निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. चॅप्टरचे प्रमुख प्रफुल्ल चंदावरकर (चॅप्टर हेड आणि मलाका स्पाईसचे मालक) आहेत. या समितीमध्ये केविन टेलीस (को चाप्टर हेड आणि टॉइटचे मालक), सिद्धार्थ महाडिक (एनआरएआयचे सचिव आणि ले प्लासिर चे मालक), कुणाल म्हस्के (जॉईंट सेक्रेटरी आणि पेंटहाऊसचे मालक) आणि निकी रामनानी (ट्रेजरर आणि डेली ऑल डे चे भागीदार) यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर्स होते डॉटपे व विस्टा पेपर्स तर सह प्रायोजक होते टोट्स इव्हेन्ट. कार्यक्रमाच्या असोसिएट्स स्पॉन्सर मध्ये निर्वाणा-एक्सपी, ताराडी, यवासुरा आणि उमामी ब्रेव्स यांचा समावेश होता. यावेळी ब्रेवरेज स्पॉन्सर्स होते बकार्डी, देवर्स आणि फ्राटेली . पेट्रन स्पॉन्सर्स होते तन्मय एंटरप्रायझेस, अबीर फूड्स, गुरु गोविंद ग्रोसरी, आय आय कुरेशी, मलगाना आणि यश एंटरप्रायझेस नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया ही देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये असलेली प्रमुख संस्था आहे, जी असंख्य रेस्टॉरंट्सना जोडते आणि त्यांच्या एकत्र विकासात मदत करते. १९८२ मध्ये स्थापन झाल्यापासून, असोसिएशनने या उद्योगाचा एक समुदाय तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे , जेथे एकत्र शिकणे, एकत्र योजना राबवणे आणि एकत्र प्रगती करणे यावर भर दिला जातो.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading