आषाढी एकादशी साठी 550 बसगाड्यांची व्यवस्था
पुणे:- पुणे शहरातील स्वारगेट एसटी बस डेपो मधून आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर कडे जाण्यासाठी एसटी च्या पुणे विभागातर्फे 8 ते 14 जुलै दरम्यान 550 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोनानंतर दोन वर्षांनी आषाढीवारी होत आहे त्यामुळं कुठल्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी पुणे विभाग कडून 550 जास्तीचे बस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची .माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे .आषाढी वारी यात्रा करून परत येईपर्यंत ही सेवा देण्यात येणार आहे. यांचा नागरिकांनी प्रवास करून लाभ घेण्याच असे आवाहन एस टी महामंडळ करण्यात आलं आहे ही सेवा 8 ते 14 जुलै दरम्यान असणार आहे .
