Friday, October 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

मुंबई : आज शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा विधीमंडळ गट आणि 16 अपक्ष मिळून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. शिंदे गटाला आम्ही भाजप समर्थन देणार आहोत. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज शपत घेतील, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.

फडणवीस म्हणाले, भाजप शिंदे गटाला समर्थन देत आहोत. त्या मंत्रीमंडळात मी नसेन. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथ शिंदे शपतविधी घेतील. 2019 मध्ये मी भाजपचा मुख्यमंत्री होईल असे सांगितले होते. मात्र निकालानंतर शिवसेना ही बाळासाहेबांनी विरोध केलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन केले. या मविआ सरकारने कोणतेही नवीन प्रोजेक्ट केले नाहीत तसेच यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. दोन मंत्री तुरंगात जाणे ही खेदजनक बाब होती.  रोज सावरकरांचा अपमान, हिंदूतवाचा अपमान ते करत होते. ज्यांनी बाळासाहेबांचा विरोध केला त्यांना जास्त निधी दिला गेला. जाता जाता सांभाजीनगर, धाराशीव असे निर्णय त्यांनी घेतले गेले ते नवीन सरकारला परत घ्यावे लागणार आहेत. कारण राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कोणतीही कॅबिनेट घ्यायची नसते.

एकनाथ शिंदे म्हणाले, बंड हे कोणत्या पदासाठी नाही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या ‘आयडॉलॉजी’साठी आहे. मविआ असताना मनासारखे निर्णय घेता येत नव्हते.  परंतु 50 आमदार एकाचवेळी फुटतात तेव्हा पक्षाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आज आम्ही भाजप सोबत सत्ता स्थापन करीत आहोत. भाजपचे बहुमत आहे तरी देखील त्यांनी शिवसेनेच्या एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. त्यासाठी मोठे मन असावे लागते. फडणवीस यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या काळात महाराष्ट्राचा विकास व हिताचे निर्णय घेवू.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading