Friday, October 23, 2026
Latest NewsPUNE

मनरेगा योजनेतून तब्बल 93 कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न

HDFC बँकच्या चौकसपणामुळे प्रकार उघडकीस-गजानन भोसले

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे पुतणे व दिवंगत खासदार लक्ष्मण पाटील यांचे नातू उत्कर्ष मिलिंद पाटील व अद्वैत मिलिंद पाटील यांनी बनावट चेकद्वारे केंद्र शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रताप पाटील ( पुणे ), दत्तात्रय करमपुरी ( सोलापूर ) या दोघांना अटक केली असून त्यांचा जामीन न्यायलयाने फेटाळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्कर्ष पाटील व अद्वैत पाटील त्यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नसून ते फरार असल्याची माहिती पोलीसांनी न्यायालयात दिली.
हा प्रकार पुणे येथील एचडीएफसी बँकेच्या नऱ्हे शाखेत घडला आहे. या प्रकरणी संशय आल्याने बँकेच्या व्यवस्थापकांनी चौकशी केली असता हा दरोडा लक्षात आला. त्यानंतर एचडीएफसी बँकेतर्फे नऱ्हे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात 420 कलमासह 465, 467, 511, 471, 34 अशा विविध कलमान्वये उत्कर्ष काँस्ट्रोवेल कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उत्कर्ष काँस्ट्रोवेल ही कंपनी उत्कर्ष मिलिंद पाटील व अद्वैत मिलिंद पाटील यांच्या मालकीची आहे. या कंपनीद्वारे पाटील बंधूंच्या सहीने 92 कोटी 99 लाखांचा बनावट धनादेश एचडीएफसी बँकेत जमा करण्यात आला होता. ही रक्कम शासनाच्या मनरेगा योजनेच्या खात्यातून काढण्यात येणार येणार होती.
या गंभीर गुन्ह्याबाबत तपास सुरू झाला होता, मात्र सदर कंपनी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या कटुंबियांची असल्याने आणि गृह खाते राष्ट्रवादीकडेच असल्याने या प्रकरणी प्रचंड दबाव आणण्यात आला. त्यातूनच गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात आली असा आरोप सामजिक कार्यकर्ते गजानन भोसले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला .
यापुढे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ते सरकारकडे करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading