काय झाडी…काय डोंगर.. फेम आमदारच एकनाथ शिंदे यांनी केलं तोंड भरुन कौतुक
गुवाहाटी : काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच..असं म्हणणारे शिवसेनेेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या वक्तव्यावर तर गाणं सुद्धा आलं आहे.
शहाजी पाटलांच्या या दमदार कामगिरीचे खुद्द एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे आणि हॉटेलमध्येच त्यांना डायलॉग म्हणायला लावला. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तणावपूर्ण वातावरण आहे, पण अशातच आमदार कशी मजाा करताय हे शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी हे पटवून दिलं. शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे.
अशात महराष्ट्रापासून दूर असले तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदार महोदयांना या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवल होतं. आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंच त्यांनी मनापासून कौतुक केलं. यावेळी शिंदे यांनी पाटील यांना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. मग काय शहाजी पाटलांनी एकनाथ शिंदेंसमोर हे वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवलं.
तसंच हे वाक्य किती व्हायरल झालंय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केली हे देखील दाखवून दिलं. दरम्यान, आपण एकनाथ शिंदेंसोब का आलो याबद्दल आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो आहोत. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
