fbpx

महाविकास आघाडीला सिद्ध करायला सांगा; भाजपने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : राज्यातील राजकारणआणि सत्ता नाट्यात पडद्यामागून खेळी खेळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज प्रथमच उघडपणे काही पाउल टाकले आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी आज दिल्लीवारी केल्यानंतर काही वेळा पूर्वी मुंबईत राजभवन गाठले. यावेळी बरोबर भाजपचे काही नेतेही आहेत. फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी महाराष्ट्रातील सद्यस्थितीबद्दल चर्चा केली. तसेच, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी घ्यावी असे पत्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिले. याची दखल घेत राज्यापालांकडून लवकरच विशेष अधिवेशन बोलविले जाणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकारची बहुमत चाचणी होणार.

सेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे ३९ हून अधिक समर्थक आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. आज रात्री आमदार गोव्याला जाणार आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपने आता आक्रमक धोरण स्विकारले आहे. जर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही तर हे सरकार कोसळेल. त्यानंतर राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: