Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात रंगणार कानडी भाषेतील ‘पर्व’ हे महानाट्य

पुणे  : प्रसिद्ध कन्नड लेखक पद्मश्री डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी ‘महाभारत’ या ग्रंथावर लिहिलेल्या ‘पर्व’ या कादंबरीवर आधारित महानाट्याचे पुण्यात सादरीकरण होणार आहे. तब्बल आठ तास चालणाऱ्या या कानडी भाषेतील महानाट्याचे आयोजन कन्नड संघ, पुणे आणि मैसुरू येथील रंगयना संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ३ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. नाटकाच्या प्रयोगास प्रवेश विनामूल्य असून प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्राध्यान्य या तत्वावर दिला जाईल तसेच काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी. नाटक सकाळी १०:३० ला सुरु होवून सांयकाळी ६:३० ला संपेल.

मानाचा सरस्वती सम्मान प्राप्त डॉ. भैरप्पा यांनी १९७९ मध्ये लिहिलेल्या ‘पर्व’  या कादंबरीत महाभारताची कथा ही एकपात्री प्रयोग या साहित्यिक तंत्राद्वारे मांडण्यात आली आहे.  इतिहास आणि पौराणिक कथांचे मिश्रण या कांदबरीत पाहायला मिळते. महाभारतातील कुंती, द्रौपदी, भीम, अर्जुन, कर्ण, विदुर अशा विविध पात्रांचा त्यामध्ये समावेश आहे. या पात्रांमधील  स्वीकार्याची भूक, सूड घेण्याची इच्छा, वंचिततेची भावना आणि लोक आणि समुदाय यांच्यापासून दुरावल्याची भावना ही या नाटकातून मांडण्यात आली आहे.

या कादंबरीचे मराठीसह २० हून अधिक भारतीय  भाषांमध्ये तसेच मॅनडेरीन आणि रशियन या परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहे.  पर्व या महानाट्याची निर्मिती रंगायना म्हैसूर या निर्मिती संस्थेचे प्रमुख अदांडा करिअप्पा यांनी केले असून, दिग्दर्शन प्रकाश बेलावडी यांनी केले आहे. नाटकात 35 प्रमुख पात्रांमध्ये  दुर्योधन (नंदकुमार), भीम (राजेश माधव), द्रौपदी ( कुमारी सौम्या), संजय (राजशेखर) आणि कुंती (अक्षता) यांचा समावेश आहे. कलाकारांची वेशभूषा प्रसाद बिडप्पा यांनी केली आहे. नाटकाचे संगीत रवी मारूर यांनी दिले असून, प्रकाशयोजना महेश यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading