रणबीर कपूर – आलिया भट कडे Good news
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्याकडे Good news आहे. स्वतः आलिया भटने एक फोटो शेयर करीत ‘आमचं बाळ लवकरच येत आहे’,असे ट्विट केले आहे. या ट्विटला आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करीत शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक निर्माते करण जोहर, अभिनेत्री मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे 14 एप्रिल 2022 रोजी लग्न झाले आहे. त्यानंतर लगेचच कपूर घराण्यात आता एका चिमूकल्याचे आगमन होणार आहे. दरम्यान, आलिया आणि रणबीर यांचा ऑन स्क्रिन केमिस्ट्री असलेला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ हा येत्या नऊ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
