भाजपने भूमिका स्पष्ट करावी अशी घटना अद्याप घडली नाही – चंद्रकांत पाटील
पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांनी परवा रात्री बडोदा मध्ये भेट घेतली अशी चर्चा आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजप परत सत्तेवर येते काय
असे सगळ्यांना वाटत आहे त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की त्यांची भेट झाल्याचे मला तुमच्याकडून कळत आहे. मी प्रवासात व्यस्त आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल. तेव्हा भेटी घेतात मात्र एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची भेट झालेली नाही.
एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजप राज्यात स्थिर सरकार द्यायला पुढे येणार का?*त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,अशी कोणतीही गोष्ट घडली नाही ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरिक्षण सुरु आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात जे शिवसेनेचे चालले आहे. त्यावर भाजपची भूमिका काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर पाटील म्हणाले, भाजपाचं रूटीन काम सुरू आहे.
महा विकास आघाडी सरकार स्थिर आहे का. असा सवाल भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर अशी कोणतीही गोष्ट घडली नाही ज्यात भाजपाने भूमिका स्पष्ट करावी. आमचं निरिक्षण सुरु आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
