Wednesday, October 28, 2026
Latest NewsPUNE

लहानग्यानी अनुभवला वारी सोहळा 

पुणे : गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव येथील शायनींग स्टार प्री प्रायमरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी  `ग्यानबा-तुकाराम’ चा गजर करीत वारीचा सोहळा शाळेतच अनुभवला. प्ले ग्रुप ते दुसऱ्या  इयत्तेतील विद्यार्थी पारंपाfरक वेषात या सोहळय़ात सामील झाले. 

 ज्ञानोबा तसेच तुकाराम महाराजांच्या पायी पालखी वारी सोहळय़ास सुरुवात झाली असून, लाखो भाविक यात सहभागी झाले आहेत. वारीचा हाच वारसा पुढे नेण्यासाठी व तो अनुभवण्यासाठी शायनींग स्टार प्रायमरी स्कूलमध्ये लहानग्यांचा वारी सोहळा मुख्याध्यापिका पूनम वर्मा तसेच शाळेतर्फे आयोजीत करण्यात आला होता. स्वत:च्या हाताने तयार केलेली व फुलांनी सजवलेली पालखी, विठ्ठल-रखुमाई बनलेली गोंडस बालके तसेच डोक्यावर तुळस व टाळ मृदंगाच्या लयीत तल्लीन झालेले पारंपरिक  वेषातील बाल वारकर्यानी हा वारी सोहळा जीवंत केला. 

Leave a Reply