Monday, November 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर भूम परांडा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घराजवळ शिवसैनिकांनी आंदोलन केले. होते. यावेळी त्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती.

आज पुण्यातल्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन सातारा रोड वरील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. या तोडफोडी वेळी विशाल धनवडे ,सुरज लोखंडे व पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विशाल धनवडे म्हणाले, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे बरोबर जाऊन. मोठी चुक केली आहे. त्यांनी परत उद्धव ठाकरे यांना सामील व्हावे.तानाजी सावंत यांची लायकी नसताना उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत आमदार होण्याची संधी दिली. एकनाथ शिंदे यांनी
पुकारलेला बंड हा चुकीचा आहे. शिवसेना एकनाथ शिंदे व बाकीच्या आमदारांना कदापी माफ करणार नाही. आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली म्हणून आज आम्ही यांच्या कार्यालयाची तोडफोड करत आहोत.असे विशाल धनवडे म्हणाले.

Leave a Reply