Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरले

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे आपला गट कायदेशीर रित्या स्थापन करण्यासाठी शिंदे गटांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाचे नाव ठरले असून ‘शिवसेना – बाळासाहेब ठाकरे’ हे नाव शिंदे गट ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, या नावाला शिवसेनेकडून कडाडून विरोध होत असून हे नाव व चिन्ह इतर कोणालाही वापरता येवू नये म्हणून कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत.

 

Leave a Reply