पुणे मेट्रोमध्ये वारकऱ्यांचा विठूनामाचा गजर

पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने आज १०० वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली मित्रवर्य सुनील पांडे यांच्या निमंत्रणावरून ह्या अगळ्यावेगळ्या उपक्रमाचा आनंद लाभला.गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत आणि पुन्हा गरवारे स्थानकापर्यंत वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करत होते.काहींनी फुगड्या घातल्या तर काहींनी भक्तीरसात चिंब भिजत भजनावर ठेका धरला.तर काहींनी तल्लीन होऊन नृत्य केले.

वारकऱ्यांना सालाबादप्रमाणे भोजन प्रसादाची व्यवस्था तर मंडळाने केलीच होती मात्र त्यांना मेट्रोची सफर घडवायचे ठरविले असे सुनील पांडे यांनी सांगितले. तर वारकऱ्यांच्या मेट्रो सफरीने आमचे स्थानक पावन झाल्याची भावना मेट्रोचे अतुल गाडगीळ व हेमंत सोनावणे यांनी व्यक्त केली.यावेळी संदीप खर्डेकर यांच्या हस्ते अतुल गाडगीळ यांचा तर सुनील पांडे व दत्तात्रय फंड यांच्या हस्ते हेमंत सोनावणे आणि दिंडी प्रमुख पंढरीनाथ महाराज यांचा स्मृतिचिन्ह व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,अखिल कर्वे रोड गणेशोत्सव मंडळाचे चित्रसेन खिलारे, सारथी ग्रुपचे पराग ओझा, राजेश राठोड, निलेश लाटे, भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, पुणे मेट्रोचे अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे, राजेश जैन, विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, सरचिटणीस वरूण जकातदार, उपाध्यक्ष समीर हळंदे, अभिजीत मोडक, खजिनदार गुणेश साने, रमेश गिरमकर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: