‘बाल शिव’मध्‍ये सुमतीची भूमिका साकारण्‍यासाठी साची तिवारीचा प्रवेश

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘बाल शिव’मध्‍ये लवकरच नवीन पात्राचा प्रवेश पाहायला मिळणार आहे. अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्‍ये काम केलेली साची तिवारी मालिकेमध्‍ये सुमतीची भूमिका साकारण्‍यासाठी प्रवेश करणार आहे. सुमती विद्याधर व सुलोचनाची मुलगी आहे. तिची भूमिका महासती अनुसूया – मौली गांगुलीची प्रबळ समर्थक असेल. योगायोगाने साची एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘बाल शिव’मध्‍ये प्रमुख भूमिका साकारत असलेल्‍या आन तिवारीची मोठी बहीण आहे. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘बाल शिव’मधील आपल्‍या भूमिकेबाबत सांगताना सुमतीची भूमिका साकारणारी साची तिवारी म्‍हणाली, ”सुमती निरागस तरूणी आणि महासती अनुसूयाच्‍या गुरूकूलमधील गुरू विद्याधर व सुलोचना यांची मुलगी आहे. प्रेक्षकांना सुमती व महासती अनुसूया यांच्‍यामधील अद्वितीय नाते पाहायला मिळेल. कथानकामध्‍ये अनुसूया तिला तिचा विवाह होण्‍यास कशाप्रकारे मदत करते आणि बाल शिव तिच्‍या विवाहामध्‍ये अडथळा आणणा-या कोणत्‍याही दुष्‍ट गोष्‍टींचा कशाप्रकारे विध्‍वंस करेल हे पाहायला मिळेल. यामध्‍ये पडद्यावरील व पडद्यामागील भाऊ-बहिणीचे सुरेख नाते असणार आहे.”

लहान भाऊ आन तिवारी शीर्षक भूमिका साकारत असलेली एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘बाल शिव’मध्‍ये भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याबाबत साची म्‍हणाली, ”माझा भाऊ असलेल्‍या मालिकेमध्‍ये भूमिका साकारण्‍याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सर्वोत्तम बाब आहे. आता आमच्‍याकडे एकमेकांसोबत वेळ व्‍यतित करण्‍यासाठी व खेळण्‍यासाठी भरपूर वेळ आहे. मालिकेमध्‍ये माझी भूमिका नवीन आहे. पण मी या समूहाची सदस्‍य बनली आहे. मी पडद्यावर व पडद्यामागे मौली गांगुली यांचे कौतुक करते. मला माझ्या भावामुळेच त्‍यांच्‍यापैकी बहुतेकजणांबाबत माहिती मिळाली. मी अनेकदा सेटला भेट द्यायचे आणि त्‍यांच्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करायचे. म्‍हणून माझी कलाकारांसोबत संपूर्ण टीमसोबत ओळख आहे. टीम अगदी कुटुंबासारखी आहे, म्‍हणून मला त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याची ही संधी मिळाल्‍याचा आनंद होत आहे. ते माझ्यासाठी मोठे समर्थक व मार्गदर्शक राहिले आहेत. आम्‍ही एकत्र खूप धमाल करत आहोत. मी माझा लहान भाऊ आनसोबत अधिक वेळ व्‍यतित करण्‍यास आणि टेलिव्हिजन मालिकेमध्‍ये त्‍याच्‍यासोबत अभिनय साकारण्‍यास उत्‍सुक आहे.”
साची तिवारीला सुमतीच्‍या भूमिकेत पाहण्‍यासाठी पहा ‘बाल शिव’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

Leave a Reply

%d bloggers like this: