fbpx
Tuesday, May 7, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे बेंचमार्क सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सर्वेक्षण अंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व ५९ जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सद्यस्थिती तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण, लाभ न घेण्याची कारणे इत्यादी विषयावर संशोधन करण्यात येणार आहे. धोरणात्मक शिफारशीसह संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यामध्ये अनुसूचित जातीमधील अनेक जातींची लोकसंख्या अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वेक्षणात सर्व ५९ जातींचा समावेश अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वेगवेगळ्या परीक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध समाजाच्या संस्था, संघटना, अशासकीय संस्था यामधील शिष्टमंडळ यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे क्षेत्र, कुटुंब यादी तसेच त्याअनुषंगिक माहिती बार्टी कार्यालयाला कळवावी. ही माहिती research@barti.in या ईमेल वर पाठवावी. प्राप्त माहिती अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातीचे सर्वेक्षण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख उमेश सोनवणे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading