शिवसेनेतर्फे येरवड्यात आरोग्याचा महायज्ञ

शिवसेना वर्धापनदिन व आंनद गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मोफत आरोग्य शिबीर’

पुणे : शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिन व पुणे उपशहर प्रमुख आनंदशेठ गोयल यांच्या वाढदिवसा निमित्त येरवडातील परिसरात विविध ठीकाणी तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज गुरूवर, दिनांक २३ जुन २०२२ रोजी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे हॉल, लक्ष्मीनगर, येरवडा येथे महापुरुषांना अभिवादन करून आरोग्य शिबीराला सुरूवात करण्यात आली. यावेळी शिवसेना पुणे उपशहर प्रमुख आनंदशेठ गोयल, पाला मोरे, सुनिल जाधव, राजेश काटेलु, उमेश मोरे, दीपक चव्हाण, संतोष शेडगे, अनिकेत लाड, बंटी डोरे, सारंग शेडगे, ऑड. सुक्ष्मीता जाधव तसेच वडगाव शेरी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना वर्धापनदिन व आंनद गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या ‘मोफत आरोग्य शिबीरात नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया नाव नोंदणी, त्वचा रोग, डेन्टल, जॉईंटपेन, रक्त, बीपी तपासणी आदी संपूर्ण आरोग्य तपासणी करून दिली जात आहे. यासाठी सह्याद्री हॉस्पिटल, लायन्स क्लब, पुणे व अनुर्वी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: