पुण्यात राहणाऱ्या नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थांनी साजरा केला योग दिवस
पुणे – फुलगांव येथील ‘ईश्वरपुरम’ या संस्थेत नागालँड आणि अरूणाचल प्रदेशातील ४० विद्यार्थी राहात असून या विद्यार्थ्यांनी आज ‘योग दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा केला. सकाळी विशाल वटवृक्षाखाली हे सर्व विद्यार्थी ‘भारतमाते’चे पूजन करून योग दिवसासाठी एकत्र जमले. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम असा विविध प्रकारचा योगाभ्यास या सर्व विद्यार्थ्यांनी सादर केला. ‘ईश्वरपुरम’ संस्थेसाठी ‘आयएनएफसी’ या संस्थेच्या वतीने निवडण्यात आलेल्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेलगतच्या अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. विनीत कुबेर आणि संस्थेच्या अन्य पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भारतमाता पूजन करून ‘योग दिना’चा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
