fbpx
Friday, April 19, 2024
BusinessLatest News

उडाण ने आयोजित केलेल्या ‘रिश्ता समिट’ कार्यक्रमात संपूर्ण भारतातील मिलर्स सहभागी

मुंबई : उडान हे आज भारतातील सर्वात मोठे बिजनेस -टू-बिजनेस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. आज त्यांनी आपले भागीदार मिलर्स सोबत त्यांचा ६ वा स्थापना दिवस साजरा केला. ज्यासाठी ‘रिश्ता समिट’ आयोजित करण्यात आले होते. उडानच्या प्रगतीमध्ये मिलर्सनी दिलेल्या योगदानाची माहिती करून देणारा हा एक विशेष कार्यक्रम होता.
गेल्या सहा वर्षांत, उडानने आपल्या फूड बिझनेस सोर्सिंगसाठी संपूर्ण भारतातील मिलर्स सोबत मजबूत संबंध निर्माण केले आहेत. दोन दिवसीय कार्यक्रमांद्वारे आयोजित केले गेलेले हे असे पहिले समिट होते ज्यामध्ये १९ राज्यांमधील ७५ हून अधिक मिलर्स आणि उडानच्या टीमने सहभाग घेतला होता. ‘रिश्ता’ म्हणजे नातेसंबंध या थीमसह, उडानने आपल्या विस्तृत वितरण नेटवर्क आणि किरकोळ भागीदारांद्वारे मिलर्ससाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्याशी भागीदारी मजबूत करणे हा या समिटचा मुख्य उद्येश्य आहे. उडान आपल्या सेवा केंद्रांची झपाट्याने वाढ करत आहे आणि वाढत्या मागणीसाठी संपूर्ण भारतातील भागीदार, शेतकरी आणि मिलर्ससोबत काम करत आहे, कारण त्यांचा फूड आणि एफएमसीजी व्यवसाय मोठ्या शहरांमध्ये दिवसोंदिवस विस्तारत आहे. उडान आपल्या पूर्ती केंद्रांद्वारे २००० हून अधिक मिलर्ससोबत थेट कार्य करते आणि ज्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सर्वोत्तम किंमत मिळण्यास मदत होते. उडानच्या एसेनन्शीयल्स बिजनेसमध्ये – एफएमसीजी, स्टेपल्स आणि ताज्या उत्पादनांचा समावेश असलेला किराणा, शीतपेये, तृणधान्ये, कडधान्ये, मसाले, खाद्यतेल, होम आणि पर्सनल केयर, फ्रेश आणि डेरी उत्पादने आणि प्रमुख शहरांमध्ये २०,००० हून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. यावेळी आपले विचार व्यक्त करताना अरविंद चारी, चीफ सोर्सिंग ऑफिसर, उड़ान, म्हणाले, “आमचे पहिले रिश्ता समिट म्हणजे उडानच्या यशाच्या कथेत भारतातील मिलर्सनी दिलेल्या मजबूत योगदानाची पावती आहे. विस्तृत वितरण नेटवर्क व बीटूबी ई कॉमर्समधील उडान च्या कौशल्यामुळे मिलर भागीदारांना आपली उत्पादने आणि ब्रँड्स मोठ्या बाजारपेठेत आणण्यात मदत झाली आहे. यामुळे आज उडान हा मिलर्स आणि शेतकऱ्यांसाठी पसंतीचा भागीदार बनला आहे, ते आता ई-कॉमर्स स्केलच्या फायद्यांचा आनंद घेत भारतभर आपली उत्पादने किफायतशीर किमतीत विकू शकतात.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading