fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

SSC Result – दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 96.94%

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी यंदा निकालाचा टक्का ९७.९६आहे.2020 च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.राज्य मंडळाच्या पुणे ,0नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदे मध्ये१0 वीच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. आता दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.
मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा९९.२७ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक (९५.९० टक्के)विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात कोकण विभाग पहिला तर नाशिक शेवटी

पुणे: ९६.१६

नागपूर: ९७.००

औरंगाबाद: ९६.३३

मुंबई: ९६.९४

कोल्हापूर: ९८.५०

अमरावती: ९६.८१

नाशिक: ९५.९०

लातूर: ९७.२७

कोकण: ९९.२७
या साइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार निकाल
Www. Mahresult. Nic. in
Ssc. result. mkcl. com
Ssc.maha result. org

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading