fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

व्हीनस आर्ट फेस्टीव्हलमध्ये चित्रकार प्रमोद कांबळे, डॉ. सुधाकर चव्हाण, डॉ.सुभाष पवार यांचा होणार सत्कार

४८ चित्रकार सादर करणार आपली कलाकृती

पुणे  : शहरातील ४८ चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन, चित्रकलेचे प्रात्यक्षिक त्याचबरोबर लहान मुलांसाठी दिवसभर चित्रकलेचा उत्सव अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे व्हीनस आर्ट फेस्टीव्हलचे. शहरातील सुप्रसिद्ध व्हीनस ट्रेडर्सतर्फे या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले असून, १७ ते १९ जून या कालावधीत घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हा आर्ट फेस्टीव्हल होणार आहे.

या आर्ट फेस्टीव्हलचे उद्घाटन शुक्रवारी, १७ जून रोजी सकाळी ११ वाजता अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यावेळी चित्रकार डॉ. सुधाकर चव्हाण, डॉ.सुभाष पवार, प्रमोद कांबळे यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच रीजनल कॅमेल आर्ट फौंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते सुरभि गुळविलकर आणि रूपेश सोनार यांना बक्षीस दिले जाईल. त्याचबरोबर १७ रोजी सायंकाळी ५ वाजता चित्रकार मनोहर देसाई यांचे ‘कॅलिग्राफी पेंटिंग’ विषयक प्रात्यक्षिक सादर होईल. शनिवारी, १८ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता चित्रकार विलास कुलकर्णी यांचे जलरंगावरील प्रात्यक्षिक सादर होईल.

रविवारी, १९ जून रोजी लहान मुलांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चित्रकार घनशाम देशमुख यांची चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या संपूर्ण उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.

या उपक्रमाबाबत व्हीनस ट्रेडर्स’चे सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “व्हीनस ट्रेडर्स’ला १० जून रोजी ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत या व्हीनस आर्ट फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये शहरातील ४८ चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. चित्रकलेचे प्रात्यक्षिकही सादर केले जाईल. विशेषत: लहान मुलांसाठी यानिमित्ताने दिवसभर चित्रकलेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या आर्ट फेस्टीव्हलला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हाताचे ठसे कॅनव्हासवर उमटवत प्रदर्शानानंतर हा रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसणारा कॅनव्हास पुणे विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द केला जाईल.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading