Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

ईडी ने राहुल गांधी यांना चौकशी साठी बोलवल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

पुणे : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कार्यालयात ईडी ने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ शेकडो काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी राज्यासह देशभर काँग्रेस कार्यकर्ते सोमवारी व मंगळवारी व आज असे सलग तीन दिवस ईडी कार्यालयावर धडकल्याने वातावरण चांगलेच तापले आहे,. यावेळी मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज पुण्यात पण राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यक्रत्यानी पुण्यात सुद्धा आंदोलन केले.
दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले.

या आंदोलनाला पुणे शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष रमेश बागवे, संगीता तिवारी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अभय छाजेड , नगरसेवक अविनाश बागवे ,व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अरविंद शिंदे म्हणाले, आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांना ईडी ने नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी बोलवले आहे. ये मोदी सरकार मुद्दामून आमच्या पक्षाचे राहुल गांधी यांच्यावर मुद्दामून ईडी ची कारवाई करत आहे. या मोदी सरकारला अख्या राज्यात व देशात फक्त त्यांची सत्ता पाहिजे आहे. म्हणून हे मुद्दामून करत आहे राहुल गांधी यांची काही चूक नसताना त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत मोदी सरकारने राहुल गांधी यांची या प्रकारांचा सुटका करावी. अशी आम्ही मागणी या आंदोलनातून करत आहोत. असे अरविंद शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading