Wednesday, June 3, 2026
ENTERTAINMENTLatest News

आता होणार सेलिब्रिटींची लग्न जोरात… ‘बँड बाजा वरात’

झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात सहभागी होणार आहेत प्रेक्षकांचे लाडके सेलिब्रिटी जोडपी. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहतो पण जर प्रत्यक्षात जर आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो आता हे शक्य आहे बँड बाजा वरात सेलिब्रिटींच लग्न जोरात या कार्यक्रमामुळे.

मृण्मयी देशपांडे जेव्हा प्रोमोमध्ये ‘का सांगू मी अशोक मामा कोणाशी लग्न करत आहेत?’ ते ऐकून सर्व प्रेक्षक गोंधळात पडले. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांच्या लग्नाची गंमत पहायला मिळणार असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आता पर्यंतचा प्रवास त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे सेलिब्रिटीजना देखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगायला मिळतील.

या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे व त्यांच्या सौ आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळेल. या कार्यक्रमाची सगळी धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना १७ जून पासून रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading