पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पगडी सज्ज
पुणे : ‘ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद-भ्रम अमंगळ ‘ संत तुकारामांच्या अभंगातील या ओळींचा समावेश असलेली आगळीवेगळी पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे.
पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी ही पगडी केली आहे. देहू संस्थानने हे काम मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे सोपवले होते.पुणे मेट्रो उद्घाटनानंतर पुणे पालिकेतील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातदेखील मोदी यांच्यासाठी तत्कालिन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आगळी वेगळी पगडी मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून तयार करून घेतली होती.गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले यांच्या चार पिढयांची परंपरा असलेल्या कलेची माहिती दिली.
