‘पीएमपीएमएल पुणे दर्शन लव्ह बस राईड’ उपक्रमाचे आयोजन
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात पीएमपीएमएल व 104.2 मिरची लव्ह (रेडिओ स्टेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पीएमपीएमएल पुणे दर्शन लव्ह बस राईड’ या उपक्रमाचे आयोजन दि. 19 जून 2022 दरम्यान करण्यात आले आहे. ‘पीएमपीएमएल पुणे दर्शन लव्ह बस राईड’ या उपक्रमांतर्गत पीएमपीएमएल च्या ‘पुणे दर्शन’ व ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवणाऱ्या बससेवांचे प्रमोशन 104.2 मिरची लव्ह रेडिओ स्टेशन वरून केले जाणार आहे.
104.2 मिरची लव्ह या रेडिओ स्टेशनवरून दि. 11 ते 18 जून दरम्यान ‘पीएमपीएमएल पुणे दर्शन लव्ह बस राईड’ या उपक्रमाचे प्रमोशन केले जाणार आहे. प्रवाशी नागरीक व पर्यटकांना प्रेक्षणीय स्थळांची सफर करता यावी यासाठी पीएमपीएमएल कडून ‘पुणे दर्शन’ व ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बससेवा पुरविली जाते.
दि. 11 ते 18 जून दरम्यान 104.2 मिरची लव्ह या रेडिओ स्टेशनवरून श्रोत्यांसाठी क्विज कॉन्टेस्ट चे आयोजन केले जाईल. या क्विज कॉन्टेस्ट मधून 15 भाग्यवान विजेत्या जोड्यांची निवड केली जाणार असून या 15 भाग्यवान विजेत्या जोड्यांना दि. 19 जून 2022 रोजी पीएमपीएमएलच्या पुणे दर्शन या बसमधून मोफत सफर घडविली जाणार आहे. तरी पीएमपीएमएल व 104.2 मिरची लव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पीएमपीएमएल पुणे दर्शन लव्ह बस राईड’ या 104.2 मिरची लव्ह वरून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त जोडप्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा आणि दि. 19 जून 2022 रोजी घडवल्या जाणाऱ्या ‘पुणे दर्शन’ बसच्या मोफत सफरीचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात येत आहे.
