Wednesday, June 3, 2026
Latest NewsNATIONALPUNETOP NEWS

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात संतोष जाधव पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
गुजरात राज्यातील कच्छ मधून आरोपी संतोष याला अटक करण्यात आली आहे. संतोष सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही रात्री 12 वाजता न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं असता त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संतोष
हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला हो त्यासाठी या वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधुन त्याला अटक करण्यात यश मिळवलं आहे. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.
संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. संतोष जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला हो त्यासाठी या वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधुन त्याला अटक करण्यात यश मिळवलं आहे. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading