Friday, September 11, 2026
BusinessLatest News

होंडा रेसिंग इंडियातर्फे २०२२ इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीप आणि इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी रायडर्सचा संघ जाहीर

कोईम्बतूर  : २०२२ आव्हानासाठी तयार होत होंडा रेसिंग इंडियाने आज इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीप आणि इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी रायडर्सचा संघ जाहीर केला. या वीकेंडला कोईम्बतूर येथील कारी मोटर स्पीडवेवर या रेस होणार आहेत.

एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीपच्या (आयएनएमआरसी) ५ फेऱ्यांच्या सीझनमध्ये Pro-Stock 165cc विभागात ३ रायडर्स होंडाच्या दोन सॅटेलाइट्स टीमचे प्रतिनिधीत्व करतील. होंडा CBR150R वर स्वार होऊन या टीम्स चॅम्पियनशीपमध्ये आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी टक्कर देतील.

२०२२ सीझनविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी प्रभू नागराज म्हणाले, ‘प्रेरणा आणि उत्सुकतेसह आम्ही इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीपच्या २०२२ सीझनसाठी सज्ज आहोत. यावेळेस राजीव सेतु, सेंथिल कुमार आणि अभिषेक व्ही हे आमचे तज्ज्ञ रायडर नॅशनल चॅम्पियनशीपच्या PS165cc टायटलसाठी लढत देतील. त्याचबरोबर सळसळता उत्साह असलेले २० तरुण रायडर्स इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये रेसट्रॅकवर उतरतील. रेसिंग हा होंडाच्या डीएनएचा महत्त्वाचा भाग असून हा होंडा हॉर्नेट २.० वन मेक रेससह हा मोटरस्पोर्ट्स ग्राहकांना उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. रायडर्सची कुशल टीम आणि तज्ज्ञांच्या जोरावर २०२२ च्या या सीझनमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू असा विश्वास वाटतो.’

२०२२ इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशीप – ProStock 165cc साठी होंडा रायडर्सची टीम

नॅशनल चॅम्पियनशीपच्या ProStock 165cc विभागात होंडाची धुरा इदेमित्सु SK69 होंडा रेसिंग टीमचे राजीव सेतु आणि सेंथिल कुमार हे आंतरराष्ट्रीय रायडर्स सांभाळणार आहेत. नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये आधी केलेल्या कामगिरीवरून धडे घेत तसेच यावर्षीच्या एआरआरसी अनुभवाच्या जोरावर दोन्ही रायडर्स आपल्या दमदार कामगिरीसह ट्रॅक गाजवण्यासाठी सज्ज आहेत. राजीव आणि सेंथिल यांच्याबरोबरच आस्क होंडा रेसिंग टीमचे अभिषेक वासुदेव हे ही सहभागी होणार असून त्यांनी २०१० मध्ये व्यावसायिक रेसिंग विश्वात पाऊल ठेवले होते.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी रायडर्सची टीम

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या २०२२ सीझनमध्ये ११ मिलेनियल रायडर्स मोटोथ्री चॅम्पियन या नात्याने तेच होंडा मशिन चालवतील. यामध्ये रक्षित एस. दवे, जोआन रीव्ह्ज ईमॅन्युएल, चेन्नईचे थिओपॉल लिएंडर आणि बोकारो स्टील सिटीमधून आलेले व CBR150R कपमध्ये प्रमोट करण्यात आलेले प्रकाश कामत या चार रायडर्सचा समावेश आहे. त्याचबरोबर पुण्याचे सार्थक चव्हाण, चेन्नईचे श्याम सुंदर, सॅम्युअल मार्टिन आणि बेंगळुरूचे एएस जेम्स, वेलाचेरीचे मोहसिन पी, त्रिचीचे राज दाशवंथ आणि बेळगावचे विवेक रोहित कपाडिया हे ही सहभागी होणार आहेत.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप CBR150R विभागात नऊ रायडर्स स्पर्धा करतील. ग्रिडवर बीदानी राजेंद्र, सय्यद मोहमंद आणि तेलंगणाचे पोथु विघ्नेश हे तीन नवे रायडर्स उतरणार आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला हैद्राबादमध्ये झालेल्या इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंटमध्ये त्यांची निवड करण्यात आली होती. त्याशिवाय मुंबईचे राहीश खात्री, कोल्हापूरचे सिद्धेश सावंत, चेन्नईचे श्याम बाबू आणि अश्विन विवेक, बेंगळुरूचे हर्षित बोगर आणि त्रिचीचे स्टीव वॉ सुगी ग्रिडवर सहभागी होतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading