लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील आणखी एका तरुणाला पुणे एटीएसकडून अटक
पुणे : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल या तरुणाला ताब्यात घेतले आहे.जमू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वी अटक केली होती. आता जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला पुणे न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इनामुल हा सोशल मीडियावरुन बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता.लष्कर ए तोयबासाठी काम केलं तर पैसे मिळेल. यावरुन जुनेदला अटक करण्यात आली होती. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झालं होतं.सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मिर संघटनेच्या संपर्कात आला होता,अशी माहिती आहे. तसंच इनमुलदेखील जुनैदप्रमाणेच वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दशहतवादाकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आलं आहे.अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती आहे.
