Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

रवींद्र गोलर यांची लिओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पदी निवड

पुणे :  रविंद्र गोलर यांची लायन्स क्लब ३२३४ डी २ च्या लिओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सनपदी निवड करण्यात आली आहे. वर्ष २०२२-२३ करिता ही निवड करण्यात आली आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश कोठावळे यांनी गोलर यांना निवडीचे पत्र दिले.

अहमदाबाद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात गोलर यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय अध्यक्षाचे प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले आहे. मागील १५ वर्षे ते लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लायन्स क्लब ऑफ चतुश्रृंगी ते सदस्य आहेत.

रविंद्र गोलर म्हणाले, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सनपदी निवड झाल्याने काम करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ४७ लिओ क्लबला सोबत घेऊन युवकांसाठी विविध योजना आखून त्यांच्यासोबत विकासकामे करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading