मूसेवाला हत्या प्रकरणात सौरभ महाकाळला पुणे पोलिसांनी केली अटक
पुणे: पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले होते. अखेरीस या प्रकरणात सौरभ महाकाळ या पुणे पोलिसांनी अटक केली आहे.या
प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यापैखी सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नाव समोर आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ उर्फ महाकाळ याला संगमनेर जवळ अटक करण्यात आली आहे. सिद्धेश कांबळे याच्यावर याआधी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
अटक करून न्यायालयात हजर केल्यावर 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार झाले होते. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं.
पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती. संतोष जाधव हाच आरोपी असू शकतो, त्यावरून आज पंजाब पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना विचारणा केली. गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गॅंगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते.ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केला, यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली. मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला.
सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती. गडद मुसेवाला यांच्या एकूण 23 जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं. 14 ते 15 गोळ्या मुसेवालांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. या हल्ल्यात मुसेवालाच्या शरीरवर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंतच्या खोल जखमा दिसून आल्या होत्या. सध्या पंजाब पोलीस हा हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
