Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

अक्सिस बँक आणि इंडियन ऑइलतर्फे को- ब्रँडेड रूपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लाँच

मुंबई : अक्सिस बँक आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसीएल) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासह (एनपीसीआय) भागिदारीमध्ये को- ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस इंडियनऑइल अक्सिस बँक रूपे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. फ्युएल आउटलेट्सवर सरचार्जवर मिळणारी सवलत आणि इंधन खर्चातील कॅशबॅकखेरीज या क्रेडिट कार्डाद्वारे दैनंदिन व्यवहारावर बरेच फायदे मिळणार आहेत. या फायद्यांमध्ये रिवॉर्ड पॉइंट्स, सिनेमाच्या तिकिटांवर आणि पार्टनर रेस्टरंट्समधील जेवणावर तत्काळ सवलत यांचा समावेश आहे.

प्राथमिक भेटवस्तू म्हणून ग्राहकांना कार्ड वितरित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत सर्व प्रकारच्या इंधन खर्चावर २५० रुपयांपर्यंत १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. त्याशिवाय रू. २०० ते रू. ५००० पर्यंतच्या इंधन खर्चावर सरचार्जमध्ये १ टक्का सवलत मिळेल, तसेच इंडियन ऑइल फ्युएल दालनांमध्ये १०० रुपयांच्या प्रत्येक खरेदीवर ४ टक्क्यांचे रिवॉर्ड् पॉइंट्स मिळतील.

इंडियन ऑइल अक्सिस बँक रूपे क्रेडिट कार्ड ग्राहकांना बुकमायशो वेबसाइट किंवा अपद्वारे आरक्षित केल्या जाणाऱ्या सिनेमांच्या तिकिटांवर १० टक्के तत्काळ सवलत, पार्टनर रेस्टॉरंट्समध्ये २० टक्के सवलत, ऑनलाइन खरेदी, किराणा, युटिलिटी पेमेंट्सवर खर्च केल्या जाणाऱ्या प्रत्येक १०० रुपयांवर १ टक्का किमतीचे रिवॉर्ड पॉइंट्स आणि इतर सर्व खर्चातील प्रत्येक १०० रुपये खरेदीवर १ रिवॉर्ड पॉइंट मिळेल. त्याशिवाय जर कार्डधारकाने वर्षाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यास वार्षिक शुल्क सवलतीसारख्या अतिरिक्त वैशिष्ट्याचाही त्याला लाभ मिळेल. ग्राहकांना या कार्डाद्वारे कार्डावर खर्च केल्या जाणाऱ्या प्रत्येक १०० रुपयावर १ एज रिवॉर्डच्या रुपात लॉयल्टी पॉइंट्सही मिळतील.

या भागिदारीविषयी इंडियनऑइलचे संचालक (विपणन) व्ही सतीश कुमार म्हणाले, ‘या भागिदारीसह इंडियनऑइल माननीय पंतप्रधानांनी पाहिलेल्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा आणि अनुभव देण्यास इंडियनऑइलचे प्राधान्य आहे व मला खात्री आहे, की अक्सिस बँक व रूपेसह केलेल्या सहकार्यामुळे ग्राहक सेवेचे मूल्य आणखी उंचावेल. या वैशिष्ट्यामुळे आम्हाला दोन आणि तीन चाकी क्षेत्रातील कमी मूल्याच्या व्यवहारांच्या डिजिटल क्षमतेला चालना देता येईल. आम्हाला खात्री आहे, की मोठ्या शहरांच्या बाहेर असलेल्या ठिकाणी- दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांपर्यंत व्याप्ती वाढवणे आणि विकास करणे आम्हाला शक्य होईल.’

अक्सिस बँकेच्या कार्ड्स अँड पेमेंट्स विभागाचे प्रमुख संजीव मोघे म्हणाले, ‘आम्ही सातत्याने नाविन्यपूर्ण भागिदारींच्या मदतीने ग्राहकांना उपयुक्त, बदलत्या गरजा पूर्ण करणारी, सोयीस्कर उत्पादने व अधिक लाभ मिळवून देत असतो. त्याच प्रयत्नांतून एनपीसीआयबरोबर भागिदारी करून आम्ही आमच्या क्रेडिट कार्ड नेटवर्कमध्ये रूपे लाँच केले आहे. इंडियनऑइल अक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे आमच्या सर्वोत्तम उत्पादनांपैकी एक कार्ड नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या क्षेत्रातील सर्वात रिवॉर्डिंग कार्डांपैकी एक असलेले हे को- ब्रँडेड कार्ड देशभरातील ग्राहकांना खास लाभ व रिवॉर्ड्स मिळवून देईल.’

या लाँचविषयी एनपीसीआयच्या सीओओ श्रीमती प्रवीणा राय म्हणाल्या, ‘अक्सिस बँकेसारख्या देशातील आघाडीची खासगी बँक आणि इंडियनऑइल या भारतातील प्रमुख राष्ट्रीय तेल कंपनीसह इंडियनऑइल अक्सिस बँक रूपे क्रेडिट कार्ड लाँच करण्यासाठी भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. रूपेच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार लाभ अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्याचे ठरवले असून त्याद्वारे लाखो ग्राहकांना सुरक्षित व रिवॉर्डिंग अनुभव मिळवून दिला जाणार आहे. या धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत राहू. आम्हाला आनंद वाटतो, की रूपे सातत्याने आधुनिक, समकालीन आणि युथफुल ब्रँड अशी आपली ओळख तयार करण्यासाठी प्रयत्नशील असून हे लाँच रूपेला देशातील पसंतीचे कार्ड बनण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading