वी स्मार्टऍग्रीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या इंटेलिजंट पद्धतींचा वापर करण्यासाठी सक्षम बनवले.
पुणे : नागपूर जिल्ह्यातील सिरसावाडी गावातील एक शेतकरी श्रीमती ममता ठाकूर यांनी स्वतःच्या शेतात बायोगॅस युनिट बसवून गांडूळ खत खड्डा देखील तयार केला आहे. वोडाफोन आयडिया फाऊंडेशनच्या स्मार्टऍग्री प्रकल्पामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रशिक्षण शिबीराने श्रीमती ममता यांना इंटेलिजंट आणि पर्यावरणानुकूल शेती तंत्रे अवलंबिण्याची प्रेरणा दिली. आज श्रीमती ममता यांच्या ४ एकर जमिनीतून १८ ते २० क्विंटलपेक्षा जास्त तूर डाळ, सोया बीन, कापूस आणि इतर पिके येतात. याआधी याच जमिनीतून फक्त १५ क्विंटल उत्पन्न येत होते.
स्मार्टऍग्री शिबिरांनी यवतमाळमधील अश्विनी तोंडरे यांना सॉईल सेन्सर्स आणि एचडी क्रॉप व्ह्यू कॅमेरा यासारखे शेतीची स्मार्ट तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळे त्यांना पिकांचे अधिक चांगले उत्पादन आणि अधिक जास्त उत्पन्न मिळवण्यात मदत होते. त्यांनी सेंद्रिय शेती देखील सुरु केली आहे आणि कमी खर्चात, पोषकद्रव्यांनी परिपूर्ण पिके पिकवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
ममता आणि अश्विनी यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमधील ४८५०० शेतकऱ्यांना वी स्मार्टऍग्री प्रकल्पाचे लाभ मिळाले आहेत, या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांमार्फत शेतकऱ्यांना रोजगारात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धती अवलंबिण्यासाठी मदत केली जाते. इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिअल-टाइम टेक्नॉलॉजी उपायांचा वापर करून स्मार्टऍग्री प्रकल्प शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या घटकांबद्दल माहिती पुरवतो. यामध्ये माती व हवेची गुणवत्ता, कीटक आणि पिकांची वाढ यांचा समावेश असतो.
नागपूर, अमरावती, वर्धा, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या स्मार्टऍग्री प्रकल्पाने शेतकऱ्यांना पीक उत्पादनात ८ ते १२% वाढ आणि खर्चात १५ ते २०% बचत करण्यासाठी सक्षम बनवले आहे.
स्मार्टऍग्री प्रकल्पाने निर्माण केलेल्या प्रभावाविषयी प्रतिक्रिया देताना वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचे डायरेक्टर आणि वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी अँड कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर पी बालाजी म्हणाले, “५८% भारतीयांचा प्रमुख रोजगार स्रोत शेती आहे, ग्रामीण भागात ७०% कुटुंबांची उपजीविका शेतीवर चालते. तंत्रज्ञानाचा वापर करून वोडाफोन आयडिया फाऊंडेशनचा स्मार्टऍग्री प्रकल्प भारतातील शेतीच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहे, शेतकऱ्यांमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या तसेच ‘इंटेलिजंट’ उपायांच्या वापराविषयी आत्मविश्वास निर्माण करत आहे.अशाप्रकारे तंत्रज्ञानामार्फत करण्यात येणाऱ्या आमच्या हस्तक्षेपामुळे पिकांचे उत्पादन वाढले आहे, अधिक चांगली पिके येत आहेत आणि शेतकऱ्यांना मिळणारा नफा वाढला आहे, ज्यामुळे भारतीय कृषी क्षेत्रावर सामाजिक प्रभाव घडून येत आहे. आता उत्तर प्रदेश, राजस्थान, आसाम आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये देखील या प्रकल्पाचा विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे ज्यामुळे २.८ लाखांहून जास्त शेतकऱ्यांना या परिवर्तनाचे लाभ मिळतील.”
