Tuesday, October 27, 2026
BusinessLatest News

कोलते-पाटील डेव्हलपर्स आणि टाटा पॉवर यांची भागीदारी

पुणे :  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सेवासुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी टाटा पॉवरने पुणे-स्थित आणि मुंबई व बंगलोरमध्ये देखील वेगवान आगेकूच करत असलेले, आघाडीचे स्थावर मालमत्ता विकासक कोलते-पाटील डेव्हलपर्ससोबत (केपीडीएल) भागीदारी केली आहे.  पुणे, मुंबई आणि बंगलोर या शहरांमधील सर्व कोलते-पाटील प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना चार्जिंगच्या सर्वसमावेशक सुविधा पुरवण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स सेट अप करण्यासाठी टाटा पॉवरसोबत भागीदारी करण्यात आली आहे.

शहरी भागांमध्ये वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या हवामान बदलाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हरित, पर्यावरणपूरक वाहतुकीच्या उपाययोजनांमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा महत्त्वाची भूमिका बजावतात. इव्ही चार्जिंगच्या अखंडित सुविधा पुरवण्यात कौशल्य आणि आजवर बजावलेली यशस्वी कामगिरी यांच्या बळावर टाटा पॉवर कोलते-पाटील डेव्हलपर्सच्या निवासी ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्कृष्ट इव्ही चार्जिंग सुविधा प्रदान करेल. यामुळे त्यांची इ-मोबिलिटी अधिक सुविधाजनक बनेल शिवाय त्यांना एकसमान, सर्वव्यापी इव्ही चार्जिंग अनुभव मिळवता येईल.

आपल्या ग्राहकांना सर्वसमावेशक चार्जिंग सुविधा पुरवण्यात टाटा पॉवर आघाडीवर आहे, यामध्ये चार्जर्सची मालकी, उभारणी, देखभाल आणि अपग्रेडेशन यांचा समावेश आहे.  टाटा पॉवर आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांच्या भागीदारीमुळे केपीडीएलच्या सर्व प्रकल्पांमधील इव्ही मालकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करून घेण्याची सुविधा २४X७ उपलब्ध राहील, तसेच टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाईल ऍपमार्फत मॉनिटरिंग आणि इ-पेमेंट सुविधांचा देखील त्यांना लाभ घेता येईल.

टाटा पॉवर ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे.  त्यांनी १५०० पेक्षा जास्त सार्वजनिक व अर्ध-सार्वजनिक इव्ही चार्जर इन्स्टॉल केले असून अजून ५५० पेक्षा जास्त चार्जर्सचे काम उभारणीच्या विविध टप्प्यांवर सुरु आहे. कंपनीने संपूर्ण भारतभरात १३००० पेक्षा जास्त होम चार्जर्स (खाजगी वापरासाठी) आणि २०० पेक्षा जास्त बस चार्जिंग पॉईंट्सचे नेटवर्क निर्माण केले आहे.

टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाईल ऍप्लिकेशनमुळे युजर्सना इव्ही चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत ते शोधता येते, स्लॉट्सचे प्री-बुकिंग करता येते, वाहनाचे चार्जिंग, मॉनिटरिंग, इ-पेमेंट इत्यादी सुविधा मिळतात.  ग्राहकांच्या आवश्यकता आणि सोयीनुसार दिल्या जाणाऱ्या इव्ही चार्जिंग सुविधा सातत्याने वाढत असलेल्या इव्ही इकोसिस्टिमसाठी पायाभूत संरचनेचा कणा आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना ऊर्जा बचतीच्या पर्यायांचा सुलभपणे वापर करता येतो.

टाटा पॉवरचे न्यू बिझनेस सर्व्हिसेसचे चीफ गुरिंदर सिंग संधू म्हणाले, “महामार्गांवर, निवासी व व्यापारी संकुलांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारून टाटा पॉवर भारतामध्ये घडून येत असलेल्या इ-मोबिलिटी परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे. इव्ही चार्जिंग क्षेत्रात आमच्याकडे असलेल्या तांत्रिक नैपुण्याचे बळ आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोलते-पाटील डेव्हलपर्सची प्रचंड मोठी ग्राहकसंख्या यांचा मिलाप झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे प्रमाण वेगाने वाढेल यात काहीच शंका नाही.”

यावर प्रतिक्रिया देताना कोलते-पाटील डेव्हलपर्सचे ग्रुप सीईओ श्री. राहुल तलेले म्हणाले, “टाटा पॉवरसोबत ही भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पर्यावरण, समाज, प्रशासन (ईएसजी) आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोन या गोष्टी आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोलते-पाटील डेव्हलपर्स पर्यावरणस्नेही वास्तू उभारतात, ज्यांची रचना व अंमलबजावणी आजच्यासाठी सर्वोत्तम आणि भविष्यासाठी सज्ज आहे. टाटा पॉवरसोबत भागीदारीमुळे आम्ही आमच्या प्रकल्पांमधील रहिवाशांची जीवन गुणवत्ता स्मार्ट व पर्यावरणपूरक पद्धतीने अधिक जास्त सुधारू शकणार आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading