Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या बोर्ड वर लावलेली नावे काढा- ओबीसी सेल राष्ट्रवादी कॉग्रेस

पुणे:  शहरातील ज्ञानज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले स्मारक हे शहरातील मध्यवर्ती भागात गंजपेठ , टिंबर मार्केट येथे आहे . या स्मारकाचे उद्‌घाटन 20१४ मध्ये झाले.  त्यावेळी या भागाचे आमदार . गिरीष बापट तसेच विष्णू हरिहर नगरसेवक यांच्या नावाची कोनशिला बसविणेत आली आहे तसेच मुख्य कमानीवर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा अर्थ गोलकार बोर्ड लावलेला होता . हा चांगला बोर्ड काढून त्या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावासोबत खासदार गिरीष बापट, आमदार मुक्ता टिळक , विजया लक्ष्मी हरीहर यांची नावे लिहलेली आहेत .  ती नावे तत्काल हटविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केली आहे. 

राजकिय व्यक्ती च्या नावांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत . हे जे स्मारक बांधलेले आहे याचा खर्च महानगर पालिकेने नागरीकांच्या करातून केलेला आहे . तरी या बोर्डवरती लावलेली नावे ताबडतोब काढणेत यावीत. असे पुणे महानगर पालिका आयुक्तांना व भ वानी पेठ सहाय्यक आयुक्त यांना लेखी पत्र दिले आहे. ओबीसी सेल राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी पुणेशहर अध्यक्ष दिपक जगताप यांच्या नेतृत्वा द्वारे
तसेच माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य, शिवसेना , मनसे पक्ष ‘ माळी महासंघ पुणे शहर काँग्रेस यांच्या वतिने निदर्षने करण्यात आली
या आंदोलनात गणेश नलावडे अध्यक्ष कसबा मतदार संघ विक्रम मोरे तसेच हरिष लडकत राजेंद्र आलम खाने दत्तात्रय माळी , मंगलाताई रायकर , मिनाक्षी राकेश बोराटे , सुरेखा कानडे , वंदना जाधव, रेश्मा केदारी ,, प्रज्वल बनकर , हरिश लडकत, ओंकार पेटकर , रवि सहाणे , अजित दरवडे , विठठल काळे, राकेश बोराटे , या सर्व कार्यकर्त्यांनी तिव्र शब्दात निषेध करून हा बोर्ड ताबडतोब काढणेत यावा व कारवाई करावी .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading