Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा राजीनामा

पुणे : काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने केलेल्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे दिले आहेत.

पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यानी पदे रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेस ने केलेल्या ठरावानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहराला नवा शहराध्यक्ष मिळणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वी राजस्थान मध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात एक व्यक्ती एक पद असा ठराव करण्यात आला होता.

ठरावानुसार शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश च्या अधिवेशनात 51 जणांनी तात्काळ राजीनामे दिले. त्यात रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांचाही समावेश आहे. मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून छाजेड आणि टिळक पक्षाचे काम करीत आहे तर बागवे यांनाही शहराध्यक्षपदी निवड होऊन सहा वर्षे झाली आहेत. त्यामुळे या सर्वांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश कॉंग्रेसकडे सादर केले.
शहराध्यक्षपदावरून पुन्हा एकदा शहर कॉंग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती केल्यापासून पुणे शहरातील शहराध्यक्ष पदाच्या बदलाच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या होत्या. त्यातून पक्षांतर्गत संघर्षही अनेकदा समोर आला. मात्र बागवे हे पद टिकविण्यात यशस्वी झाले. पण आता बागवे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे पुन्हा एकदा या पदासाठी पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading