Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

हॉटेल मालकाने कचरा वेचकांवर टाकले उकळते पाणी, दोघांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील सासवड येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासवड येथील एका हॉटेल मालकाने तीन कचरा वेचकांवर उकळते पाणी टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. धक्कादायकबाब म्हणजे या घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एकाची मृत्यूंशी झुंज सुरू आहे.

ही घटना 23 मे रोजी दुपारी सासवड येथे घडली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या  दबावामुळे कोणतीच कारवाई केलेली नाही. दरम्यान, एक कचरावेचक महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सादर प्रकार उजेडात आला. या व्हीडिओमध्ये पीडित महिलेजवळ एकाने विचारणा केली असता तिने सदर प्रकारा विषयी माहिती दिल्याचे दिसते. यामध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यांवर पडलेला दिसत आहे. त्याच्या हातावर, पायावर व शरीराच्या इतर भागांवर भाजल्याच्या जखमा दिसत आहेत. शिवाय पिडीत महिलेने स्वतः या प्रकाराविषयी कथन केल्याने सर्वच स्तरातून या घटने विषयी चिड व्यक्त केली जात आहे. तसेच कठोर कारवाईचे मागणी केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading