राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा धमकीचा पहिला फोन कॉल नसून तिसऱ्यांदा हा फोन कॉल आल्याचे उघड झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात फोन करुन एका अज्ञात व्यक्तीने रूपाली चाकणकर यांना ‘पुढील 24 तासात जीवे मारू’ अशी धमकी दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाला धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायकबाब म्हणजे, मागील काही दिवसातील धमकीचा हा तिसरा फोन कॉल आहे.
दरम्यान, अनेक दिवस रिक्त असलेले राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष स्वीकारल्या नंतर रुपाली चाकणकर यांनी प्रभावीपणे काम करायला सुरूवात केली आहे. अनेक राजकीय घडामोडींवर व घटनांवर त्यांनी ठामपणे मतं नोंदवली आहेत.