Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे मेट्रो लाईन ३ च्या कामाला गती

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवरील पुणे मेट्रो लाईन ३ अर्थात पुणेरी मेट्रोच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. टाटा समूहाची स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी असलेल्या पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सुरु असलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीला ठिकठिकाणी वेग आलेला पहावयास मिळत आहे. 

गुरुवार, २६ मे पर्यंत तब्बल १० हजार ५४९ चौरस मीटरचे बॅरीकेडींगचे काम पूर्ण झाले आहे. या शिवाय युनिव्हर्सिटी रोड आणि हिंजवडी येथे खांब उभारणीसही सुरुवात झालेली पहायला मिळते आहे. पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअरच्या समोर आणि हिंजवडी येथील हॉटेल विवांताच्या समोर या खांबांची बांधणी केली जात आहे. एकूण १० खांबांची उभारणी पूर्ण झालेली असून, येत्या काही दिवसांत हा आकडा वाढविण्याचा ‘पीआयसीटीएमआरएल’चा मानस आहे. हे खांब प्रत्यक्ष पूल बांधणीसाठी उभारले जात आहेत. या शिवाय स्टेशन साठी बनवल्या जाणा-या पाईल कॅप्ससह खांबांच्या पाईल कॅप्सची एकूण संख्या आता ४१ झालेली आहे. 

हिंजवडी येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या (हाय टेन्शन लाईन्स) शिफ्टींगचेही काम वेगाने सुरु आहे. सध्या सव्वाआठ किलोमीटर लाईन्सचे शिफ्टींग काम पूर्ण झालेले असून आता फक्त शेवटचे साडेचारशे मीटर अंतराच्या लाईन शिफ्टींगचे काम उरलेले आहे. त्याखेरीज ०४ खांबांची डिसमेंटलींग प्रोसेस केवळ ०४ दिवसात पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यायोगे मेट्रो लाईन ३च्या कामाला हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर विविध भागांमध्ये लक्षणीय वेगाने सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे शिफ्टींग हे या कामासाठी असलेल्या महत्वपूर्ण पूरक कामांपैकी एक आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ कामाचा आढावा

(गुरुवार २६ मे अखेर)

बॅरीकेडींग – १०,५४९ चौ.मी.

रस्तारूंदीकरण – ३,०४४ चौ.मी

पायलींग – ५९५

पाईल कॅप – ४१

व्हायाडक्ट पीअर – १०

एच.टी लाईन शिफ्टींग – ८.२५ किलोमीटर

टॉवर डिसमेंटल – ०४

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading